भारतातील प्रथम महिला डॉक्टर म्हणून जगप्रसिद्ध ठरलेल्या आनंदीबाई जोशी यांच्या खऱ्या आयुष्यावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी एका स्रीचे मोलाचे कार्य असते असे म्हटले जाते. परंतु हे वाक्य प्रत्येक वेळी लागू होईल असे नाही ना! तर प्रत्येक स्रीच्या पाठीसुद्धा तिला आधार देत आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करणारे पुरुष जगात असतात. अशाच पद्धतीचा 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) हा आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटातून आनंदीबाईंच्या आयुष्यातील खरा आधारवड म्हणून गोपाळराव जोशी नेहमी त्यांच्या सोबतीला कणखरपणे उभे राहिले. तर या बायोपिकमधून गोपाळराव जोशी यांची मुख्य भूमिका अभिनेता ललित प्रभाकर करणार आहे. आनंदीबाईंचे लग्न हे वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षात गोपाळराव यांच्यासोबत करुन देण्यात आले. परंतु गोपाळरावांनी आनंदीबाईंच्या वडिलांना माझ्या मनाप्रमाणे शिकवणार अशी गळ घातली. तसेच आयुष्यातील संकंटावर मात करुन गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकवल्याने ते खरे त्यांच्या आयुष्यातील आधारवड बनले आहेत.(हेही वाचा-Anandi Gopal Motion Poster : पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर)
या चित्रपटाच्या टीझरमध्ये अद्याप आनंदीबाईंची मुख्य भुमिका कोण साकारणार हे अजून गुलदस्यात आहे. तर येत्या 15 फेब्रुवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.