आनंदी गोपाळ चित्रपट (फोटो सौजन्य- यु ट्युब)

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  तर आनंदी गोपाळ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

आनंदी गोपाळ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत. तसेच नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. झी स्टुडिओ प्रस्तुत यांच्या चित्रपटाच्या या पोस्टरवर ज्या देशास माझ्या धर्मासकट मान्य नाही, तो देश मला मान्य नाही असे खडे बोल लिहिले आहेत. तर आनंदीबाई यांचं पोर्ट्रेट ही दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटातील प्रमुख भूमिका कोण साकारणार यावर अद्याप सांगण्यात आलेले नाही. तसेच येत्या 15 फेब्रुवारी 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे.