लता मंगेशकर आणि रानू मंडल (संग्रहित संपादित प्रतिमा)

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे गाणे गाऊन प्रसिद्धी मिळवणाऱ्या रानू मंडल (Ranu Mandal) आता सोशल मीडिया सेलिब्रिटी बनल्या आहेत. एवढेच नव्हे तर, रानू हिच्या आवाजाने प्रभावित होऊन हिमेशने (Himesh Reshammiya) त्याच्या अगामी चित्रपटात तिला गायक म्हणून संधी दिली आहे. तसेच रानु मंडल यांचे गाणे रेकॉर्डिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक दिग्गज लोकांनी रानू मंडल यांच्या आवाजाचे कौतूक केले आहे. परंतु, लता मंगेशकर यांनी रानू मंडल यांना सल्ला दिला होता. हा सल्ला नेटकऱ्यांनी न आवडल्यामुळे लता मंगेशकर यांना ट्रोल केले जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक भिकारी सारखी दिसणारी महिला अतिशय शोभायमान शैलीने 'शोर' चित्रपटाचे 'एक प्यार का नगमा है' हे गाणे गात होती. व्हायरल व्हिडीओमध्ये गायलेल्या महिलेचे नाव रानू मंडल आहे. ती पश्चिम बंगालमधील रानाघाट स्थानकात गाणे गाऊन आपले पोट भरत होती. हिमेशने रानूच्या आवाजाने प्रभावित होऊन त्याच्या आगामी 'हॅपी हार्डी' आणि 'हीर' चित्रपटात तिला संधी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर 'तेरी मेरी कहानी' या गाण्याला आणि रानू मंडल यांच्या आवाजाला मोठी पसंती मिळत आहे. परंतु भारताची 'गानकोकिळा' अशी उपमा मिळवणारी लता मंगेशकर यांनी रानू मंडलला सल्ला दिला होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी लता मंगेश यांना ट्रोल केले आहे.

लता मंगेशकर काय म्हणाल्या?

'आयएएनएस'शी बोलताना लता मंगेशकर यांनी आपले मत व्यक्त केले होते. "माझ्या गाण्यांमुळे कोणाचे भले होत असेल तर, मी नशीबवान आहे. परंतु इतर मोठ्या कलाकारांची गाणी गाऊन तुम्हाला ठराविक काळासाठी प्रसिद्धी मिळेल. मात्र, त्यात नवनिर्मितीक्षमता नसल्यास ती प्रसिद्धी फार काळ टिकू शकत नाही." असे त्या म्हणाल्या होत्या.

यावर लता मंगेशकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रानू मंडल खरेच लता मंगेशकर यांना टक्कर देतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लता मंगेशकर यांनी दिलेला सल्ला त्यांना भलताच महागात पडला आहे. लता मंगेशकर यांच्या मनात रानू यांच्या बाबातीत ईर्षा निर्माण झाली आहे. तसेच गायणाच्या स्पर्धेत लता मंगेशकर यांना टक्कर देण्यासाठी रानू मंडल यांचा समावेश झाल्यामुळे त्यांना दुख झाले आहे. या शब्दात लता मंगेशकर यांना ट्रोल केले जात आहे.