Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आता प्रशासनाकडून मुंबई, पुणे शहरामध्ये लॉकडाऊन करण्याच्या तयारीमध्ये सरकार आहे. देशामध्ये 125 कोरोनाग्रस्त असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात असल्याने आता सामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासनासोबतच कलाकार मंडळी देखील पुढे आली आहेत. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनीदेखील नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान ट्वीटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी Coronavirus pandemic हे अस्वस्थ करणारं संकट असल्याचं म्हटलं आहे. पण आपण याबाबत अफवा पसरवू नयेत तसेच घाबरून जाण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. सोबतच आपण जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छता पाळणं गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्यांना सर्दी, खोकला आहे त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. सोबतच आरोग्य प्रशासनाने दिलेले आदेश पाळवेत असं सांगत सुरक्षित आणि आरोग्यदायी राहा असे ट्वीट लता मंगेशकर यांनी करत त्यांच्या चाहत्यांना कोरोनापासून सुरक्षित राहण्याचं आवाहन केले आहे. Coronavirus बाधित रुग्णांच्या हॉस्पिटलमधील पलायनावर संतापला रितेश देखमुख; ट्विट करत व्यक्त केल्या भावना.

लता मंगेशकर यांचं ट्वीट

लता मंगेशकर यांंचं नागरिकांना आवाहन 

दरम्यान महाराष्ट्रात एकून 39 कोरोनाग्रस्त असून त्यापैकी एकाचा आज उपचारादरम्यान मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ती व्यक्ती 60 वर्षांवरील असून कोरोनाची लागण असली तरीही इतर आजारांचा धोकादेखील त्यांना असल्याने सुरूवाती पासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अशातच त्यांची आयुष्यासोबत असलेली झुंज अपयशी ठरली आणि आज सकाळी 7 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवत सर्व सामान्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याचा आदेश पालिका आणि राज्य सरकार कडून देण्यात आला आहे.