Riteish Deshmukh (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात 156,000 लोकांना याचा संसर्ग झाला आहे. तर 5,800 हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संपूर्ण जगासह भारतालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. देशात कोरोनाचे एकूण 126 रुग्ण असल्याची पुष्टी आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यातच कोरोना रुग्ण हॉस्पिटलमधून पळाल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा संपात नागरिकांबरोबच सेलिब्रेटींनाही अनावर झाला आणि रितेश देशमुख, बिपाशा बसू या सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

भारतात सुमारे 100 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यातील 11 जणांनी हॉस्पिटलमधून पलायन केल्याचे वृत्त समोर आले. या वृत्ताच्या व्हिडिओवर रिट्विट करत रितेश देशमुख याने लिहिले की, हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे. सरकार आणि डॉक्टरांना तुमची मदत करु द्या. एकांतात राहिल्याने तुमच्या मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि अनोळखी लोकांना निर्माण होणारा धोका कमी होईल. त्याचबरोबर तुम्हाला योग्य उपचारही मिळतील. आपण सर्व सैनिक आहोत. आपण सर्वजण मिळून याचा नक्कीच सामना करु.

रितेश देशमुख ट्विट:

यावर बिपाशा बसू म्हणते, लोक इतके कसे बेजबाबदार आणि निष्काळजीपणे वागू शकतात. देशाचे नागरिक असल्याने आपण जागरुक असणे गरजेचे आहे. तसंच या परिस्थितीत आपली मदत करण्यासाठी सरकारला आपण पूर्णपणे मदत करायला हवी. हे खूप अचंबित करणारे आहे. (Coronavirus पासून सुरक्षित राहण्यासाठी अभिनेते दिलीप कुमार देखील Self Quarantine मध्ये! ट्वीट करत दिला चाहत्यांना 'हा' सल्ला!)

बिपाशा बसू ट्विट:

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 39 रुग्ण असून त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.