जेव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले होते 52 ऑस्कर पुरस्कार; हॉलीवूडमध्ये माजला होता हाहाकार
ऑस्कर पुरस्कार (Photo Credit : Youtube)

मोठ्या थाटामाटात यावर्षीचा 91 वा ऑस्कर पुरस्कार (Oscar Awards) सोहळा पार पडला. ग्रीनबूक (GreenBook) व रोमा (Roma) या चित्रपटांनी यावर्षी बाजी मारली. ऑस्कर आणि वाद यांचे नाते फार जुने आहे. कधी वादामुळे तर कधी काही घटनांमुळे ऑस्कर पुरस्कार नेहमीच चर्चेच राहतो. मागच्या वर्षी चुकून वेगळ्याच चित्रपटाचे नाव ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून घोषित करण्यात आले होते. तर यावर्षीचा ऑस्कर हा होस्ट विनाच पार पडला. 2000 सालचा ऑस्करही असाच गाजला होता. मार्च 2000 मध्ये, लॉस एंजेलिसमधून तब्बल 55 ऑस्कर ट्रॉफी गायब झाल्या होत्या. ऑस्कर पुरस्कारांसाठी काही दिवसच शिल्लक राहिले असताना ही चोरीची घटना घडली होती. हे पाहून प्रशासन चकित झाले होते, प्रसारमाध्यमांना धक्का बसला होता. हॉलीवूडमध्ये तर एकाच हाहाकार माजला होता.

हे पुरस्कार कुठे आणि कसे गेले याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने, 1982 पासून ऑस्कर ट्रॉफी बनविणारी व्यक्ती, आर. एस ओवेन्सने यांनी ताबडतोब 55 नवीन ट्रॉफी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी 20 कामगारांनी 24/7 काम करून नव्या ट्रॉफी बनवल्या. (हेही वाचा: Academy Awards 2019: ऑस्कर 2019 मध्ये GreenBook ची बाजी; पहा विजेत्या सिनेमा, कलाकारांची संपूर्ण यादी

चोरीच्या काही काळानंतर, विली फुलगियर नावाच्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 52 ऑस्कर ट्रॉफी आढळल्या होत्या. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या विलीने आपल्याकडे हॉलीवूडच्या कोणत्याही स्टारपेक्षा जास्त ऑस्कर असल्याचा दावा केला होता. मात्र या प्रकरणाची त्याने ऑस्करला माहिती दिली होती. त्यानंतर ऑस्कर परिषदेने विलीला 5000 डॉलरचे बक्षीस दिले होते, शिवाय खुश होऊन ऑस्करची दोन तिकिटे देखील देण्यात आली होती. चोरी करणाऱ्याने घाबरून या पुरस्कारांना कचऱ्यात टाकले असावे, त्यानंतर 2003 मध्ये फ्लोरिडातील रेड ड्रग दरम्यान एक ट्रॉफी सापडली, इतर दोन ऑस्कर अद्याप गायब आहेत.

काही वर्षांनंतर खुलासा झाला की, चोरी झालेल्या ऑस्कर ट्रॉफी त्यावर्षीच्या नव्हत्या, तर त्या पुढील वर्षीच्या होत्या. ऑस्कर दरवेळी 1 वर्षे आधी ट्रॉफी बनवते. नंतर कधीही चोरीचा ऑस्कर पुरस्कार दिला जात नाही म्हणून विलीकडून मिळालेल्या 52 ट्रॉफीही नष्ट करण्यात आल्या.