Academy Awards 2019: ऑस्कर 2019 मध्ये GreenBook ची बाजी; पहा विजेत्या सिनेमा, कलाकारांची संपूर्ण यादी
Oscars 2019 (File Photo)

Oscar Awards 2019 Winners List: जागतिक स्तरावर मानाचा समजला जाणारा ऑस्कर सोहळा यंदा अमेरिकेच्या लॉस अ‍ॅन्जेलिसमध्ये (LA) पार पडला. यंदाच्या 91 व्या अ‍ॅकॅडमी अवॉर्ड्समध्ये 'रोमा' (Roma) आणि 'ग्रीनबुक'  (GreenBook) या  सिनेमांमध्ये लढत होती. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा सूत्रसंचालकाशिवाय पार पडला. यामध्ये जागतिक स्तरावरील सर्वोकृष्ट कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. Oscars Award 2019: भारतीय निर्माती Guneet Monga च्या 'Period End of Sentence' ने ऑस्कर पटकावला; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्ररी म्हणून गौरव

91 व्या अ‍ॅकॅडमी अवॉर्डसच्या विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - ऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिट

सर्वोत्कृष्ट अभिनेता - रमी मॅलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सडी

सर्वोत्कृष्ट सिनेमा - ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - Alfonso Cuaron

सर्वोत्कृष्ट गाणं - शॅलो - अ स्टार इज बॉर्न

सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा - ब्लॅकक्लॅन्सम

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ब्लॅक पँथर

सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा - ग्रीन बुक

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - स्किन

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फर्स्ट मॅन

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट - पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - बाव

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड फीचर - स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स

बेस्ट कॉस्ट्यूम डिझायनर: रुथ कार्टर

बेस्ट सिनेमेटोग्राफी: रोमा

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रेजिना किंग, फिल्मः इफ बील स्ट्रीट कुड टॉक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: मेहरशला अली, फिल्म : ग्रीन बुक

बेस्ट प्रोडक्शन डिझाइन:   ब्लॅक पँथर

बेस्ट फिल्म एडिटिंग अवॉर्ड: Bohemian Rhapsody

30 वर्षापूर्वीही कुणीही या सोहळ्याला होस्ट केलं नव्हत. यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादामध्ये होता. ‘दी अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतल्याने वाद रंगला होता.