What A Man Gotta Do: अखेर Jonas Brothers चे नवे गाणे प्रदर्शित; पहा पती निक जोनस सोबत प्रियंकाचा Sexy Dance (Video)
Stills from What A Man Gotta Do Video Song (Photo Credits: YouTube)

Jonas Brothers New Song: हॉलीवूडमधील एक लोकप्रिय बँड तसेच संगीतकार म्हणून जोनास ब्रदर्स (Jonas Brothers) कडे पहिले जाते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोनास ब्रदर्सचे नवे गाणे, ‘What A Man Gotta Do’ प्रदर्शित झाले आहे. महत्वाचे म्हणजे या गाण्यात निक जोनास (Nick Jonas) सोबत प्रियंका चोपडादेखील (Priyanka Chopra) दिसून येत आहे. बघता बघता हे गाणे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, चाहत्यांनी या गाण्याला पसंती दिल्याचे लक्षात येत आहे. या गाण्याबद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. प्रियंका चोपडाने यापूर्वी या गाण्याचे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.

या गाण्याचे बोल, व्हिडीओ, डान्स जितका अप्रतिम आहे, तितकाच यातील निक आणि प्रियंकाचा सेक्सी डान्सही चाहत्यांना आवडला आहे. या गाण्याच्या सुरुवातीला निक जोनास पॅंटशिवाय फक्त शर्ट घालूनच नाचताना दिसत आहे. या संपूर्ण गाण्यात तो आपली पत्नी प्रियंका चोप्राला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी प्रियंकाही निकसोबत पॅंटशिवाय नाचू लागते.

(हेही वाचा: मिडियासमोर निक जोनास ला किस करताना प्रियंका चोपड़ा कडून झाली ही चूक; अशी केली सारवासारव; पाहा मजेशीर व्हिडिओ)

पहा गाण्याचा व्हिडिओ -

निक आणि प्रियंका यांच्यासह या गाण्यात निक जोनासचा भाऊ, जो जोनासदेखील आपली पत्नी सोफी टर्नरसोबत नाचताना दिसत आहे. तसेच केविन-डेनियल यांची जोडीही या गाण्यात आले. अशाप्रकारे संपूर्ण कुटुंब या एका गाण्यात दिसून येत आहे. यापूर्वीही या बँडचे 'Sucker' गाणे रिलीज झाले होते. या गाण्यातही सर्व जोनास भाऊ आपल्या पत्नींसोबत दिसले होते. त्या गाण्यालाही चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले. कदाचित 'Sucker'  चे यश पाहूनच जोनस ब्रदर्सनी पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंबाला गाण्यात एकत्र आणले आहे.