बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) आणि हॉलिवूडचा विदेशी बॉय निक जोनास (Nick Jonas) ही गोडजोडी विवाहबंधनात अडकली आणि त्यानंतर एकाहून एक रोमँटिक अंदाजाने सा-या चाहत्यांची मने जिंकली. या दोघांमध्ये 10 वर्षांचा फरक असल्यामुळे अनेकांनी या जोडीवर टिका केल्या, मस्करी केली पण या दोघांनी आपल्या गोड नात्याची झलक अनेक समारंभात, पार्ट्यांमध्ये दाखविली. याची झलक आणखी एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
यात व्हिडिओमध्ये एका विदेशी पत्रकाराने ऑन कॅमेरा प्रियंका चोपड़ा ला ओठांचे चुंबन घ्यायला सांगितले. प्रियंकाने निकला किस केले ही मात्र किस केल्यांनतर तिच्याकडून काहीतरी चूक झाल्याचे लक्षात आले तिने त्वरित तिची चूक दुरुस्तही केली. पाहा मजेशीर व्हिडिओ
हेदेखील वाचा- प्रियंका चोपड़ा आणि निक जोनास यांची प्रेमकहाणी लवकरच पडद्यावर; 'देसीगर्ल' बनवत आहे स्वतःच्या लग्नावर चित्रपट
या व्हिडिओत प्रियंका ने निकला चुंबन घेतल्यानंतर निकच्या ओठांना तिची लिपस्टिक लागली तिने त्वरित आपल्या हातांनी पुसून ती गोष्ट हसण्यावरी नेली.
1 डिसेंबर 2018 रोजी हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही परंपरेमध्ये प्रियंका आणि निकचं लग्न 1 डिसेंबरला धूमधडाक्यात पार पडलं. त्यानंतर त्यांनी दिल्लीत मोठं ग्रँड रिसेप्शनही दिलं होतं.