'अमेरिकन हाउसवाइफ' आणि 'शिकागो जस्टिस'सह अनेक शोमध्ये दिसलेली हॉलिवूड अभिनेत्री लिंडसे एरिन पर्लमन (Lindsey Pearlman) लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) मृतावस्थेत आढळली आहे. 43 वर्षीय अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिंडसे एरिन पर्लमन बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला होता. अहवालानुसार, लिंडसे एरिन पर्लमनचा मृतदेह शुक्रवारी, 18 फेब्रुवारीच्या सकाळी सापडला. लॉस एंजेलिसमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानंतर एका स्थानिक रहिवाशाने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी या मृतदेहाची ओळख लिंडसे एरिन पर्लमनचा असल्याचे सांगितले. पोलीस सध्या अभिनेत्रीच्या मृत्यूचा तपास करत आहेत. अजूनही तिच्या बेपत्ता होण्याचे कारण समजू शकले नाही. लिंडसेचे पती वन्स स्मिथ यांनी ही दुःखद बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्याने लिहिले- 'पोलिसांना लिंडसे सापडला आहे. ती गेली आहे आणि मी पूर्णपणे मोडलो आहे. बाकी मी नंतर सांगेन, पण तुमच्या प्रेमाबद्दल आणि तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचे आभार. यावेळी मी लिंडसेच्या कुटुंबाला प्रायव्हसी देण्याचे आवाहनही करतो.
लिंडसे बेपत्ता झाल्याची बातमी 16 फेब्रुवारी रोजी मिसिंग पर्सन अॅडव्हायझरीमध्ये देण्यात आली होती. एलए पोलिसांनी सांगितले की लिंडसे घरी अनेक दिवस घरी परतली नाही. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीला 13 फेब्रुवारी दुपारी शेवटचे पाहिले होते. मात्र, लिंडसेचे पती वन्स यांनी सांगितले की, त्यांची पत्नी 15 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास शेवटची दिसली होती. (हेही वाचा: Suicide: ऑस्कर विजेत्या दिग्दर्शिका रेजिना किंगच्या मुलाची गळफास लावून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट)
जनरल हॉस्पिटल, अमेरिकन हाउसवाइफ, शिकागो जस्टिस यांसारख्या टीव्ही मालिकांमधील भूमिकेसाठी लिंडसे ओळखली जाते. शिकागो जस्टिसमधील तिच्या भूमिकेसाठी ती शिकागोहून लॉस एंजेलिसला गेली. तिने सात वर्षे सेक्स सिग्नल्स या टूरिंग शोमध्येही काम केले.