Oscars 2021: लवकरच होणार चित्रपट विश्वातील मानाच्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा; जाणून घ्या भारतामध्ये कुठे व कधी पहाल हा सोहळा
OSCARS (Photo Credits: Getty)

अखेर तो क्षण आला आहे. जगभरातील चित्रपट प्रेमी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात तो, अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2021 (Oscars 2021) होऊ घातला आहे. ऑस्कर 2021 रविवार, 25 एप्रिल 2021 रोजी होईल. मात्र, भारतीय प्रेक्षक 26 एप्रिल रोजी पहाटे 5.30 ते 8.30 यावेळेत हा सोहळा पाहू शकतात. यंदाच्या कार्यक्रमाची होस्ट ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्रा आणि तिचा पती संगीतकार निक जोनास यांनी 93 व्या अकादमी पुरस्कारासाठी (93rd Academy Awards) नामांकने 15 मार्च रोजी जाहीर केले होते. या जोडप्याने लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे 23 श्रेणीसाठी नामांकने जाहीर केली होती.

15 मार्च पासून नक्की कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. आता अवघ्या काही तासांमध्ये हे पुरस्कार जाहीर होणार आहेत. तुम्ही ऑस्करच्या Oscar.com या अधिकृत संकेतस्थळांवर संपूर्ण नामांकने पाहू शकता. तसेच ऑस्करच्या सोशल मीडिया हँडल्सवरही याची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.

सध्याची कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता, सामाजिक अंतरांच्या निकषांचे पालन करत ऑस्कर 2021चे थेट प्रक्षेपण होणार आहे. आपण ते Oscar.com वर किंवा त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता. सोशल मीडिया हँडल्सवरही हा सोहळा पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

(हेही वाचा: प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी केली 'ऑस्कर 2021' च्या नामांकनाची घोषणा, पहा संपूर्ण यादी)

दरम्यान, ऑस्कर पुरस्कार हा एन्टरटेनमेंट जगातील सर्वांत मोठा आणि मौल्यवान पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात. यावर्षी कोविड-19 साथीच्या आजारामुळे हा सोहळा लांबणीवर पडला आहे.