जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात अनेक दिग्गज मंडळीही अडकली आहे. जगभरातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी जेम्स बॉण्ड' (James Bond) फेम अभिनेत्री ओल्गा कुरिलेन्कोने (Olga Kurylenko) आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर ओल्गाने स्वत:चं घरात विलगीकरण केलं होतं. आता तिची प्रकृती बरी झाली आहे.
ओल्गाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कोरोनावर मात केली असल्याचं सांगितलं आहे. यात ओल्गाने म्हटलं आहे की, 'मी आता पूर्णपणे बरी झाली आहे. एक आठवड्यापूर्वी मला ताप होता आणि माझे डोके प्रचंड दुखत होते. मी जास्तवेळ झोप घेत होते. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात माझा ताप गेला. पण थोडा कफ आणि थकवा जाणवत होता. दुसऱ्या आठवड्यात मला बरं वाटू लागलं आहे. माझा कफ कमी झाला आहे. आता मी माझ्या मुलासोबत वेळ घालवत आहे,’ असंही ओल्गाने म्हटलंय. (हेही वाचा - Coronavirus: आमच्या इमारतीतील दोन जणांना कोरोनाची लागण; अभिनेता साहिल खान ने पसरवली अफवा)
ओल्गाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वत:ला आपल्या घरातील एका रुममध्ये सर्वांपासून विलग ठेवलं होतं. दोन आठवड्यानंतर ओल्गाची प्रकृती बरी झाली असून तिने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. यासंदर्भात तिने स्वत: खुलासा केला आहे.