साहिल खान (PC - Instagram)

Coronavirus: सध्या जगभरात कोरोना व्हायरसने दहशत माजवली आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 450 हून अधिक झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अशातच काही अफवामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरत आहेत. कोरोना संदर्भातील कोणत्याही अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. मात्र, तरीदेखील अफवा पसरवणं चालुचं आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता साहिल खान याने आमच्या इमारतीतील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवली आहे. ही अफवा खोटी असल्याने त्याला जाहीर माफी मागावी लागली आहे.

साहिलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत संबंधित व्यक्तींची माफी मागितली आहे. प्राप्त माहितीनुसार, साहिलने त्याच्या इमारतीत राहणाऱ्या दोन व्यक्तींची कोरोनाची बाधा झाल्याच सांगितलं होतं. मुंबईतील गोरेगाव उपनगरातील आमच्या 'इंपीरियल हाइट्स' या सोसायटीमध्ये दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात एका व्यक्तीचं वय 72 वर्ष आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्ष आहे,’ असं साहिलने म्हटलं होतं. यासंदर्भात कोणतेही पुरावे नसताना साहिलने ही अफवा पसरवली होती. त्यानंतर त्याने आपल्याला चुकीची माहिती मिळाल्याचं म्हणत संबंधित व्यक्तीची जाहीर माफी मागितली आहे. (हेही वाचा - हॉलिवूड अभिनेत्री डेबी मजार हिला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर दिली माहिती)

 

View this post on Instagram

 

Regret Inconvenience Due to Incorrect Post Here Is The Authentic One

A post shared by India’s Fitness & Youth IC⭕️N (@sahilkhan) on

साहिल सध्या बॉलिवुडपासून दूर आहे. मात्र, तो आजही फॅशन इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. त्याने आतापर्यंत ‘स्टाइल’, ‘एक्सक्युज मी’, ‘यही हैं जिंदगी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादीन’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक कलाकार मंडळींनी नागरिकांना घरात राहण्याचं आणि स्वत: ची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.