हॉलिवूड अभिनेत्री डेबी मजार हिला कोरोना व्हायरसची लागण; इन्स्टाग्रामवर दिली माहिती
कोरोना व्हायरसने जगातील सर्वचं देशात आपले पाय पसरवले आहेत. अनेक दिग्गज तसेच कलाकारदेखील कोरोनाच्या विळख्यातून वाचवू शकलेले नाही. आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात भारतातील बॉलिवुड गायिका कनिका कपूर हिचादेखील समावेश आहे.
By Bhakti Aghav | Published: Mar 23, 2020 04:04 PM IST
Younger actress Debi Mazar (PC - Instagram)
कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगातील सर्वचं देशात आपले पाय पसरवले आहेत. अनेक दिग्गज तसेच कलाकारदेखील कोरोनाच्या विळख्यातून वाचवू शकलेले नाही. आतापर्यंत अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात भारतातील बॉलिवुड गायिका कनिका कपूर हिचादेखील समावेश आहे.
हॉलिवूड अभिनेत्री डेबी मजार (Debi Mazar) हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. डेबी मजारने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. डेबीने आपल्या इन्स्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. डेबीच्या चाहत्यांना या गोष्टीचा मोठा धक्का बसला आहे. डेबीच्या अनेक चाहत्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. परंतु, डेबीने पोस्टमध्ये ती ठीक असल्याचं सांगितलं आहे. (हेही वाचा - कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या नखऱ्यांनी रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ वैतागला)
दरम्यान, मागील आठवड्यात कनिका कपूर हिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु, तरीदेखील तिने अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. त्यामुळे तिच्यापासून अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कनिकावर धोकादायक आजार पसरवण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या तिच्यावर ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील डॉक्टरांनीदेखील कनिका स्टाफला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे. नेटीझन्सनी कनिकावर टीका केली आहे. याशिवाय दाक्षिणात्य अभिनेता प्रभास रविवारी जॉर्जियावरून परतला. त्यानंतर त्याने स्वत: ला आयसोलेट केलं. त्याच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं.
(The above story first appeared on LatestLY on Mar 23, 2020 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).