बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कनिकाला कोरोनाची बाधा झाली असतानादेखीत तिने विविध हायप्रोफाईल पार्ट्यांना हजेरी लावली होती. या पार्ट्यांमध्ये तिचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे शनिवारी तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने कोणाचीही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. या सर्व प्रकारानंतर कनिकांवर सर्वांनी टिका केली. तिच्या बेजाबदारपणामुळे तिच्यावर धोकादायक आजार पसरवल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कनिकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, कनिकांच्या नखऱ्यांला रुग्णालयातील स्टाफदेखील वैतागला आहे. यासंदर्भात रुग्णायलाच्या संचालकाने माहिती दिली आहे.
कनिका कपूरवर सध्या लखनऊ शहरातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु, तिच्या वागण्यामुळे रुग्णालयातील संपूर्ण स्टाफ वैतागला आहे. लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रेजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संचालकांनी कनिकावर हा आरोप केला आहे. कनिका कपूर रुग्णालयातील डॉक्सर्संना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. (हेही वाचा - Coronavirus In India: 'जनता कर्फ्यू' दरम्यान नेमक्या कोणत्या सुविधा बंद आणि सुरू राहणार?)
कनिकाला सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. तिला ज्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. तेथील रुम आयसोलेशन रूम एअर कंडिशन आहे. या रुममध्ये सर्व सुविधा आहेत. मात्र, ती रुग्णलयातील स्टाफला कनिका चांगली वागणूक देत नाहीय. रुग्णालयात ती स्वत: ला स्टार समजत आहे. त्यामुळे संपूर्ण स्टाफ तिच्या या नखऱ्यांना वैतागला आहे, असंही रुग्णालयाच्या संचालकांनी सांगितलं आहे.