Janata Curfew | Photo Credits: Twitter/ ANI

भारतामध्ये कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी आज (22 मार्च) दिवशी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशभरात या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसादात सुरूवात झाली आहे. आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. सध्या अवघे जग 'कोरोना व्हायरस' विरूद्ध  पुर्ण ताकदीनिशी लढत आहे. यामधून भारत देशाची सुटका नाही.मात्र आता या संसर्गात देशात प्रसार थांबवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुकारलेल्या 'जनता कर्फ्यू' मुळे यामध्ये नेमक्या कोणत्या सेवा सुरू राहणार आणि कोणत्या बंद याबाबत तुमच्या मनात भीती असेल तर जाणून घ्या आज नेमका जनता कर्फ्यू पाळताना कोणत्या गोष्टींबाबत सजग नागरिक म्हणून आपण वावरणं गरजेचे आहे आणि आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तुम्हांला कुठे मिळू शकते मदत? भारतामध्ये जनता कर्फ्यू लागू; Coronavirus चा धोका टाळण्यासाठी देशाच्या विविध भागातून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद.  

जनता कर्फ्यू मध्ये कोणत्या सुविधा मिळू शकतात?

पोलिस व्यवस्था

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कामावर सज्ज असतील.

वैद्यकीय मदत

जनता कर्फ्यू असला तरीही फार्मसी, मेडिकल सर्व्हिस, वैद्यकीय मदत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

आपत्कालीन सेवा

आपत्कालीन सेवांमध्ये सहभाग असलेल्या सार्‍या सेवा सुरू राहतील. यामध्ये अ‍ॅम्ब्युलंस, फायर ब्रिगेडच्या सेवा सुरू राहतील.

पेट्रोल पंप

राज्यात पेट्रोल मर्यादित वेळेमध्ये सुरू राहणार आहे.

जनता कर्फ्यू मध्ये काय बंद राहणार?

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था

मुंबई लोकलमध्ये 22 मार्चपासून सामन्यांना प्रवेश रोखण्यात आला आहे. मात्र रेल्वेच्या एकूण क्षमतेच्या 60 टक्के लोकल गाड्याच मुंबईत चालवण्यात येणार आज मुंबई मेट्रो, मोनो रेल्वे सेवा बंद राहणार आहे. रिक्षा, टॅक्सी सेवा देखील ठप्प राहणार आहे. मर्यादित स्वरूपात ओला, उबर सेवा सुरू राहतील. Coronavirus Crisis मध्ये ओला व उबरचा मोठा निणर्य; बंद केल्या प्रवाशांच्या आवडत्या ‘या’ महत्वाच्या सेवा

हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स बंद

मुंबई सह महाराष्ट्रात आज हॉटेल्स बंद राहणार आहे. शॉपिंग सेंटर, मॉल्स बंद राहणार आहे. मात्र किराणा मालाची दुकानं काही ठिकाणी सुरू राहतील. दूध, किंवा अन्य ऑनलाईन डिलव्हरी देणारी काही सेवा अंशतः सुरू राहणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार, कोरोना व्हायरस विरूद्धच्या लढ्यामध्ये आता डॉक्टर आणि अन्य सेवा देणार्‍या सेवेकरांचे आभार मानण्यासाठी 5 वाजता टाळ्या वाजवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सध्या देशात 300 पेक्षा अधिक कोरोनाबाधित आहेत.