'Captain America: The First Avenger' फेम अभिनेत्री Mollie Fitzgerald हिला आईची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक
Mollie Fitzgerald | ( Photo Credits: Instagram)

कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट एवेंजर (Captain America: The First Avenger) या जगप्रसिद्ध चित्रपटात झळकलेली मॉलि फिजगेराल्ड (Mollie Fitzgerald) या अभिनेत्रीस ऑलथे पोलिसांनी अटक केली आहे. मॉलि फिजगेराल्ड हिच्यावर तिची आई पेट्रीशिया फिजगेराल्ड (Patricia Fitzgerald हिची हत्या केल्याचा आरोप आहे. या आरोपाखालीच पोलिसांनी तिला मंगळवारी (2 जानेवारी 2020) अटक केली आहे. पोलिसांनी मॉली हिच्यावर सेकंड डिग्री मर्डर असा आरोप ठेवत गुन्हा नोंद केला आहे. मॉलि ही यशस्वी अभिनेत्री आहेच परंतू ती यशस्वी दिग्दर्शक म्हणूनही ओळखली जाते.

'कॅप्टन अमेरिका' या चित्रपटात स्टार्क गर्लची भूमीका निभावलेल्या मॉलि हिच्यावर आरोप आहे की, तिने आपल्या 68 वर्षी आई पेट्रीशिया फिजगेराल्ड हिची बेदम मारहाण करुन हत्या केली आहे. पोलिसांना पेट्रीशिया हिचा मृतदेह ऑलथे येथील राहत्या घरात 20 डिसेंबर रोजी सापडला होता. ऑलथे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रीशिया हिला बेदम माराहण झाल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन पोलीस घटनास्थळी गेले तेव्हा पेट्रीशिया ही गंभीर स्वरुपात जखमी झाली होती. पोलिसांनी उपाचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. (हेही वाचा, Arianny Celeste: जगातील सर्वात सुंदर, तितकीच महागडी रिंग गर्ल एरियनी सेलेस्टे हिचे कॅलेंडर 2020 साठी हॉट फोटोशूट)

दरम्यान, 'कॅप्टन अमेरिका: द फर्स्ट एवेंजर' चित्रपटासोबतच मॉलि फिजगेराल्ड सन 2018 मध्ये 'ट्रबल इन माय बिजनेस', 2014 मध्ये 'द लॉफुल ट्रुथ', सन 2011 मध्ये 'अबसर्ड इल्यूजन' आदी चित्रपटांतून झळकली होती.