धक्कादायक! 18 वर्षीय मुलीची प्रत्येक वाढदिवसाला Rapper T.I. टेस्ट करतो तिची वर्जिनिटी, शो दरम्यान केला खुलासा
T.I. American Rapper (Photo Credits-Twitter)

अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर टी. आय. (T.I.) याने त्याच्या मुलीच्या संदर्भातील एक धक्कादायक खुलासा एका शो दरम्यान केला आहे. त्यावेळी त्याने असे म्हटले की, माझी 18 वर्षीय मुलगी असून तिच्या प्रत्येक वाढदिवसाला मी तिची वर्जिनिटी टेस्ट करतो. टी. आय. याने हा खुलासा नायनीज आणि नाडिया मधील प्रसिद्ध पॉडकास्ट शो 'लेडीज लाइक अस' मध्ये केला आहे. या धक्कादायक खुलासानंतर टी. आय. याच्यावर सोशल मीडियात जोरदार टीका केली जात आहे. तसेच त्याच्या चाहत्यांकडून सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे.

लेडीज लाइक अस या शोदरम्यान टी. आय. याला असे विचारण्यात आले की, मुलीच्या सेक्सबाबत बोलतोस का? खरंतर अॅन्करला त्याला सेक्स एज्युकेशन बाबत बोलत होतती. मात्र यावर उत्तर देत टी. आय.ने असे म्हटले की त्याची मोठी मुलगी गायनेकॉलॉजिस्टकडे जाते त्यावेळी मी सुद्धा जातो. मात्र डॉक्टरांनी असे म्हटले की मुलीच्या परवानगी शिवाय तुम्हाला कोणतीही माहिती देणे अयोग्य आहे. त्यावेळी मुलीला विचारले की कोणती अशी गोष्ट आहे जी तुला माझ्यापासून लपवायची नाही आहे? त्यावर मुलीने परवानगी दिली. तिचा 18 वा वाढदिवस आहे आणि अद्याप वर्जिन आहे. (खुशखबर! Game of Thrones चा प्रीक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला; HBO ने प्रसिद्ध केला लोगो, पहा काय असेल कथा Photo)

वडिलांकडून मुलीबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे टी. आय. ला चांगलेच महागात पडले आहे. त्याची मुलगी डेजाह हॅरिस हिने अद्याप अधिकृत कोणतेही विधान केलेले नाही. मात्र वडिलांवर टीका करणाऱ्या काही ट्वीट्सला तिने लाइक केले आहे. यापूर्वी सुद्धा टी. आय. याला 2009 मध्ये अनधिकृतरित्या मशीन गन खरेदी केल्याप्रकरणी सात महिने तुरुंगात होता. त्यानंतर 2011 मध्ये ड्रग्ज प्रकरणी सुद्धा दहा महिने तुरुंगाची शिक्षा भोगावी लागली होती. तर टी. आय. याने तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकला आहे.