Grammy Awards 2020 मधील बोल्ड ड्रेसिंग स्टाईलमुळे प्रियंका चोपड़ा झाली ट्रोल
Priyanka Chopra And Nick Jonas (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) हिने हॉलिवूडच्या पॉपस्टार निक जोनास (Nick Jonas) शी लग्न केलं आणि ती विदेशी गर्ल झाली. तिने आपल्या वैवाहिक जीवनात एवढी बिझी राहिली की ती काही काळ बॉलिवूडपासून दूर राहिली. सध्या ती आपला नवरा निक सोबत आपले वैवाहिक आयुष्य मस्त एन्जॉय करतेय. सोशल मिडियावर तसे फोटोही ती शेअर करत असते. तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे ती कधीकधी चाहत्यांना भावते तर कधी कधी ती ट्रोल होते. नुकत्याच झालेल्या Grammy Awards 2020 साठी तिचे बोल्ड ड्रेसिंग स्टाईल सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या कपड्यांवर तिला अनेकांनी सोशल मिडियावर ट्रोल केले आहे.

या पुरस्कार सोहळ्याला प्रियंका पांढ-या रंगाचा गाऊन घातला होता मात्र हा गाऊन वरुन थोडा सैल आणि उघडा आहे. या वर नेटक-यांना तुला ड्रेसिंग सेन्स नाही, तू भारतीय संस्कृती विसरलीस, अशा शब्दांत ट्रोल केले आहे.

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

Priyanka chopra with her husband nick 😍🔥

A post shared by Awe Indian (@aweindian) on

हेदेखील वाचा-  अभिनेत्री प्रियंका चोपड़ा ला जेवणात आवडतो हा 'मराठमोळा' पदार्थ; ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

सध्या प्रियंका चित्रपटांपेक्षा अशाच कारणांमुळे जास्त चर्चेत असते. ती सोशल मिडियावर निकसह घालवलेले सुट्ट्यांचे हॉट आणि रोमँटिक फोटोही शेअर करत असते.

प्रियंका ने जेव्हा आपल्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेल्या निक जोनाससोबत लग्न केले तेव्हापासून ती ट्रोल व्हायला सुरु झाली होती. त्यानंतर तिचे व्हेकेशन फोटोज, हॉलिवूड पार्टी, ब-याच पुरस्कार सोहळ्यांनाही दिसली.