जितेंद्र यांच्या नावावरून एकता कपूर हीने ठेवलं तिच्या बाळाचं नाव, सोशल मीडियात हळव्या पोस्टमधून व्यक्त केल्या भावना
एकता कपूर (Photo Credits: Ekta Kapoor Instagram)

एकता कपूरने (Ekta Kapoor) आज तिच्या चाहत्यांना 'आई' झाल्याची गोड बातमी दिली. हिंदी मालिका आणि सिनेमामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणारी निर्माती अशी ओळख असलेली एकता कपूर सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. तिच्या आयुष्यात 27 जानेवारी दिवशी एका चिमुकल्या मुलाचं आगमन झालं आहे. चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करताना एकताने तिच्या मुलाचं नाव 'रवी' (Ravie Kapoor) ठेवल्याचं सांगितलं आहे. एकता कपूर झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलाला जन्म

वडील जितेंद्र कपूरच्या नावावरून नामकरण

एकताच्या मुलाचं नाव रवी (Ravie) असं ठेवण्यात आलं आहे. सिनेसृष्टीमध्ये येण्यापूर्वी जितेंद्र (Jeetendra Kapoor)  यांचं मूळ नाव देवील रवी असं होतं. मात्र इंग्रजी स्पेलिंगनुसार रवी या नावापुढे एकताने ई जोडलं  (Ravi-e) आहे.

एकताने व्यक्त केल्या मनातल्या भावना

आई होणं हा जगातल्या सुंदर अनुभवांपैकी एक असल्याचं सांगत माझ्या आयुष्यात आता हे 'पालकत्त्व' पर्व सुरू झालं आहे. बाळाच्या आगमनानंतर माझ्या सोबतच माझ्या कुटुंबामध्ये किती आनंदाचं वातावरण आहे हे मी शब्दांत सांगू शकत नाही अशा भावना एकता कपूरने सोशल मीडीया पोस्टमध्ये लिहून व्यक्त केल्या आहेत.

एकता कपूर पूर्वी तिचा भाऊ तुषार कपूरच्याही आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून जून 2016 मध्ये एक मुलगा आला आहे. लक्ष्य कपुर असं त्यांचं आहे. सध्या दुसर्‍यांदा आजोबा झाल्याने जितेंद्र कपूरही आनंदात आहेत.