अभिनंदन: एकता कपूर झाली आई, सरोगसीद्वारे दिला मुलाला जन्म
एकता कपूर (Photo: Instagram)

छोट्या पडद्यावरील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून आज एकता कपूर (Ekta Kapoor)कडे पहिले जाते. टीव्हीवर कौटुंबिक मालिकांचा ट्रेंड घेऊन येऊन, रातोरात एकता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. एकताच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर आपण जाणतोच मात्र तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार काही माहिती समोर येत नाही. अशातच मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आता एकता कपूर चक्क आई झाली आहे. आपल्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत एकतानेही सरोगसीद्वारे 27 जानेवारी रोजी एका मुलाला जन्म दिला आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.

तुषार कपूर (Tusshar Kapoor) सरोगसीद्वारे जून 2016 मध्ये वडील झाला होता. आता एकताही तुषार प्रमाणे ‘सिंगल मदर’ झाली आहे. ज्या लोकांना मुले होत नाहीत किंवा सिंगल असल्याने जे लोक मुलांचा विचार करू शकत नाहीत त्यांच्यासाठी एकता आणि तुषार हे एक उदाहरण ठरतील यात काही शंका नाही. (हेही वाचा : सरोगसी बिलः गर्भाशय विकता येणार नाही, पण भेट देता येईल!; जाणून घ्या सरोगसी म्हणजे नेमकं काय?

 

View this post on Instagram

 

Baby n boo(boooaaaa)

A post shared by Ek (@ektaravikapoor) on

आपण लग्न करणार नसल्याचे एकताने आधीच स्पष्ट केले होते. मात्र आपल्याला आई बनायचे आहे ही इच्छादेखील तिने बोलून दाखवली होती. जेव्हा आपण मुलाची जबाबदारी घेण्यास सक्षम होऊ तेव्हा आपण याचा विचार करू असे तिचे मत होते. आता या घटनेवरून एकता एका मुलाची जबादारी घेण्यास पूर्णतः सक्षम झाली असल्याचे दिसत आहे. सध्या इंडस्ट्रीमध्ये तुषार आणि एकतासह करण जोहर हा देखील 'सिंगर पॅरंट' आहे. करण मार्च 2017 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा पिता बनला.