अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूक असणार आहे. या निवडणूकीमध्ये राजकीय हस्तक्षेप पहायला मिळत आहे. प्रसाद कांबळींना आशिष शेलार तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा आहे. या निवडणूकीसाठी 60 सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या मागील महिन्यात पार पडलेल्या निवडणूकीमध्ये प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनल' आणि प्रशांत दामले यांचं 'रंगकर्मी समूह' मध्ये निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या 'रंगकर्मी समूहा'चे दहा तर प्रसाद कांबळी यांच्या पॅनलचे चार उमेदवार नियामक मंडळावर निवडून आले आहेत. त्यामुळे आता अध्यक्ष कोण होणार याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल मध्ये 10.30 च्या सुमारास निवडणूक पार पडणार आहे. नियामक मंडळाचे 60 सदस्य 19 जणांना मतदान करणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये 1 अध्यक्ष, 2 उपाध्यक्ष, 1 कार्यवाहक, 3 सहकार्यवाहक, 1 कोषाध्यक्ष आणि 11 सभासदांचा समावेश असणार आहे. नाट्यपरिक्षदेचा अध्यक्ष आणि कार्यवाही यांच्यासह या अन्य नेमणूका देखील महत्त्वाच्या आहेत. राज्यातील 52 नाट्यगृहे होणार सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज; प्रशांत दामले यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती .
विनाश नारकर, अजित भुरे, वीणा लोकूर, भाऊसाहेब भोईर, शैलेश गोजमगुंडे, सतीश लोटके, समीर इंदुलकर, सुकन्या कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, सविता मालपेकर, सुशांत शेलार हे कार्यकारी समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत.