Dadasaheb Phalke 149 Birth Anniversary: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा जन्म 30 एप्रिल 1870 साली झाला. आज 149 जयंती निमित्त अनेकांनी दादासाहेब फाळके यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे. आज सिनेक्षेत्र ही भारतामध्ये एक खूप मोठी इंडस्ट्री बनली आहे. पण त्याची सुरूवात नेमकी कशी झाली याची कहाणी देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे. अमेरिकन डिप्लोमॅट्स जेव्हा सई ताम्हणकर, रिंकू राजगुरू आणि सुबोध भावे च्या मराठी सिनेमातील लोकप्रिय डायलॉग्स बोलतात... दादासाहेब फाळके जयंती आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर US Consulate Mumbai ने शेअर केला मजेदार Video
दादासाहेब फाळकेंबद्दल खास गोष्टी
- दादासाहेब फाळके यांचे संपूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके.
- “लाईफ ऑफ ख्राईस्ट” या येशू ख्रिस्तांच्या आयुष्यावरील एक सिनेमा त्यांनी 1911 साली पाहिला आणि त्यावरून आपणही सिनेमा बनवायचा असा त्यांनी निश्चय केला.
- चित्रपट निर्मिती विषयी अधिक माहिती मिळवायची या उद्देशाने त्यांनी लंडन गाठले. सिने निर्मितीची माहिती मिळवली. तंत्रज्ञान अवगत केल्यानंतर त्यांनी कॅमेरा आणि काही साधनं विकत घेऊन 1 एप्रिल 1912 दिवशी ' फाळके फिल्म्स'ची निर्मिती केली.
- “रोपट्याची वाढ” ही डॉक्युमेंट्री शूट करण्यासाठी त्यांनी मटारचे दाणे पेऊन त्यांच्या पेरणीपासून पूर्ण वाढीपर्यंतची प्रक्रिया शूट केली.
- रोपट्याची वाढ ही डॉक्युमेंट्री यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ' राजा हरिश्चंद्र' हा पहिला मूकपट बनवला. लेखन, संवाद, दिग्दर्शन ही सारीच जबाबदारी सांभाळल्यानंतर अखेर सिनेमा तयार झाला आणि या सिनेमाने नवनवे विक्रम रचले.
- दादासाहेब फाळके यांनी एकूण 47 सिनेमांची निर्मिती केली आहे. 'गंगावतरण' हा त्यांनी बनवलेला पहिला बोलपट आहे.
- दादासाहेबांचे निधन नाशिकमध्ये 16 फेब्रुवारी 1944 साली झाले. त्यांच्या निधनानंतर 1970 सालपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरूवात झाली.
- दादासाहेबांच्या आयुष्यावर आधारित हरीश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा 2010 साली आला. त्यालादेखील रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
प्रयोगशील, उद्योगी, मनस्वी वृत्तीचे दादासाहेब फाळके यांची कहाणी स्वप्नांचा ध्यास घेणार्यांसाठी जीवंत प्रेरणादायी उदाहरण आहे.