अभिनेता Milind Soman याच्या विरोधात गोवा बीचवरील धावतानाचा Naked फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्याने गुन्हा दाखल
मिलिंद सोमण (Photo Credits-ANI)

प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याने 4 नोव्हेंबर रोजी त्याचा 55वा वाढदिवस साजरा केला. याच पार्श्वभुमीवर मिलिंद हा आपल्या पत्नीसोबत गोव्यात आला होता. त्यावेळी मिलिंद याने स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला होता. त्यात मिलिंद याचा न्यूड पद्धतीचा बीचवर धावतानाचा तो फोटो होता. हा फोटो मिलिंद याने शेअर केल्यानंतर सर्वांच्याच भुवया मात्र उंचावल्या गेल्या होत्या. पण आता मिलिंद याने पोस्ट केलेल्या या फोटोवरुन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Milind Soman आणि Ankita यांचा Kissing Video होतोय सोशल मीडियावर वायरल)

ANI यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद सोमण याच्या विरोधात आयपीसी सेक्शन 29, सेक्शन 67 आणि आयटी अॅक्ट जो त्याने फोटो शेअर केला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद याने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा न्यूड फोटो शेअर केला आहे.(Milind Soman चं 55 व्या वाढदिवसा दिवशी समुद्रकिनारी Nude Run; सोशल मीडीयात पोस्ट केला फोटो)

Tweet:

Tweet:

दरम्यान, मिलिंद याने न्यूड फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियात त्याची खिल्ली उडवली गेली. नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया ही दिल्या. असे काहीही असो पण मिलिंद सोमण हा नेहमीच एक फिटनेस पर्सानिलिटी म्हणून  चर्चेत असतो. ऐवढेच नाही तर त्याची आई आणि बायको अंकिता कंवर सुद्धा त्याला यामध्ये साथ देताना बहुतांश वेळा दिसून येतात. तर मिलिंद हा त्याच्या Pinkthon याचे प्रमोशन करताना दिसून येतो. पिंकथॉन ही देशातील सर्वात मोठी महिलांना Running करण्यासाठी प्रोत्साहन करणारी एक संस्था आहे.