Milind Soman आणि Ankita यांचा Kissing Video होतोय सोशल मीडियावर वायरल
Milind Soman and Ankita (Photo: Instagram)

मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर हे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असलेलं कपल आहे. हे कपल नेहमीच विविध कपल गोल्स सेट करत असतं. प्रेमाला वय नसतं हे या दोघांचं मतच नाही तर त्यांनी ते सिद्ध देखील करून दाखवलं आहे.

मिलिंद सोमण हा बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो सध्या त्याच्या खासगी आयुष्यात जास्तच रमेलला दिसून येतो. नुकताच मिलिंद अंकितासोबत लेहला व्हेकेशनसाठी गेला आहे.

त्यांच्या या रोमँटिक व्हेकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच गाजत आहेत. इतकंच नव्हे तर मिलिंदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक Kissing Video सुद्धा शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, "मनाली वरून लेहला जाताना रोहतांग जवळ व्यतीत केलेला मजेशीर क्षण. आपल्या सोबत आपली जवळची व्यक्ती नसेल तर उंचीवर असलेल्या ठिकाणी उडी मारण्यात काही मजाच नाही."