ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अनुष्काकडून विराटला खास भेट
Virat And Anushka (Photo Credit: Instagram)

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकून नवा विक्रम रचला आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली ही ऐतिहासिक कामगिरी भारताने केली आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघासोबतच देशभरात क्रिकेट प्रेमींनी या विजयाचा आनंद साजरा केला आहे. विराटसोबत ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या अनुष्का शर्मानेदेखील हा विजय सेलिब्रेट केला आहे.

पहा भारतीय संघाचं सेलिब्रेशन 

 

View this post on Instagram

 

Love Love 😍😍 @virat.kohli @anushkasharma

A post shared by ▀▄▀▄▀▄ Ajinkya Rahane ▄▀▄▀▄▀ (@ajinkyaarahane) on

अनुष्काने मैदानात येऊन विराटला घट्ट मिठी मारून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. खेळ संपल्यानंतर मीडियाशी बोलताना विराट कोहलीने त्याच्या कारकीर्दीमधील हा भारतीय संघाचा सगळ्यात मोठा विजय असल्याच्या भावना बोलून व्यक्त केल्या आहेत. IND vs AUS 4th Test : 70 वर्षांनी भारताने जिंकली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका, सिडनी टेस्ट ड्रॉ झाल्याने भारताची 2-1 सरशी

भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांची दमछाक झाली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ रद्द झाला. सिडनी कसोटी ड्रॉ झाल्याने भारत 2-1 अशा आघाडीने मालिका जिंकला.