Liger: विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ चित्रपटातील जबरदस्त लूक, पाहा पोस्टर
Liger (Photo Credit - Instagram)

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. अनन्या पांडे (Ananya Panday) या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून विजय देवरकोंडाची थेट स्पर्धा सुपरस्टार बॉक्सर माईक टायसनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) ही  महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहत्यांनी या चित्रपटाची दीर्घकाळ वाट पाहिली होती आणि आता लवकरच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची वेळ येत आहे. शनिवारी, निर्मात्यांनी लायगरमधील विजय देवराकोंडाचे नवीन पोस्टर रिलीज केले ज्यामध्ये तो पूर्णपणे नग्न दिसत आहे. त्याच्या एका हातात पुष्पगुच्छ आहे. विजय देवरकोंडाचे हे सुपर बोल्ड पोस्टर रिलीज होताच चर्चेत आले आहे. यापूर्वी आमिर खानच्या पीके चित्रपटाचे असे पोस्टर बनवण्यात आले होते जे वादानंतर मागे घ्यावे लागले होते.

आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका 

लायगरचा मुख्य अभिनेता विजय देवरकोंडा याने स्वतः या चित्रपटाचे पोस्टर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एक चित्रपट ज्याने माझे सर्व काही घेतले. कामगिरी, मानसिक, शारीरिकदृष्ट्या ही माझी आतापर्यंतची सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. मी माझे सर्वस्व तुला दिले आहे. मी लवकरच येत आहे.' (हे देखील वाचा: अभिनेता जय भानुशाली आणि माही विजच्या चिमुकलीला जीवे मारण्याची धमकी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

अनेकांना पीकेची आठवण 

विजय देवराकोंडाच्या या लूकवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या लूकमध्ये विजय देवराकोंडा पाहिल्यानंतर अनेकांना पीकेची आठवण झाली आहे.