व्हिडिओ: सुपरस्टार रजनीकांत यांचा कन्या सौंदर्या हिच्या विवाहात हटके स्टाईल डान्स
Rajinikanth Dance Video in Daughter Marriage | (Photo credit: archived, edited, representative image)

Soundarya Rajinikanth and Vishagan Vanangamudi Wedding: दक्षिण सूपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची द्वितीय कन्या सौंदर्या रजनीकांत (Soundarya Rajinikanth) हिचा बहुचर्चीत विवाह अखेर आज (11 फेब्रुवारी) संपन्न होत आहे. आपल्या कन्येचा विवाह संपन्न होताना अभिनेता रजनीकांत यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. कन्या सौदर्याच्या विवाहात वरबाप असलेला हा सूपरस्टार अगदी सर्वसामान्या व्यक्तिप्रमाने हटके डान्स करताना पाहायला मिळाला. रजनीकांत यांच्या या हटके डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. सौंदर्या रजनीकांत ही विशगन वनांगामुडी (Vishagan Vanangamudi) याच्यासोबत नवा संसार थाटत आहे. विशेष म्हणजे सैंदर्या आणि विशगन या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.

सौंदर्या हिनेही आपल्या विवाहाबाबत कोणतीही गुप्तता न बाळगता आपल्या विवाहाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. या छायाचित्रांमध्ये निळ्या आणि सोनेरी रंगातील सिल्क साडीत सौंदर्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तर, विशगन वनानगामुडी याने पांढरा शर्ट आणि धोतर नेसले आहे. सौंदर्याच्या संगीत सेरेमनीत सुपरस्टार रजनीकांत काळ्या रंगाचा कुर्ता पायजम्यात पाहायला मिळाला. तर, त्यांची पत्नी लता हीने हिरव्या रगांची साडी परिधान केली होती. रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या आणि तिचा पती धनुष हेसुद्धा या सेरेमनीत पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच सौंदर्या हिने ट्विटरवर आपल्या विवाहाबाबत माहिती दिली होती. तिने एक फोटोही शेअर केला होता. ज्यात ती अत्यंत पारंपरीक वस्त्रांमध्ये पाहायला मिळत होती. दरम्यान, सौंदर्याने सोशल मीडियावर लग्नापूर्वी शेअर केलेल्या छायाचित्रासोबत एक कॅप्शनही लिहीली होती. 'केवळ एक आठवडा बाकी आहे. नववधूच्या मनस्थितीत.' असे ते कॅप्शन होते.

सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनांगामुडी हे दोघेही दुसऱ्यांदा विवाह करत आहेत. दोघांनीही या आधी आपापल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतला आहे. सौंदर्या हिचा अश्विन राजकुमार यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे. दोघांनी 2010 मध्ये विवाह केला होता. मात्र, 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्याआधी सौंदर्या हिने 2016 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांना वेद नावाचा 5 वर्षांचा मुलगाही आहे. अश्विन राजकुमार हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. (हेही वाचा, रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या, विशागन वनानगामुडी सोबत विवाहबंधनात अडकली, पहा शाही विवाहाचे काही क्षण (Photos))

दुसऱ्या बाजूला, विशगन वनांगामुडी याचाही या आधी घटस्फोट झाला आहे. एका वृत्तपत्राची संपादिका कनिखा कुमारन हिच्यासोबत विशगन यांनी विवाह केला होता. मात्र, हा संसार फार काळ टीकू शकला नाही. दोघांमध्ये घटस्फोट झाल्यानंतर कनिखा कुमारन हिने वरुन मनियन यांच्यासोबत विवाह केला. वरुन मनियन हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत.