रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्या, विशागन वनानगामुडी सोबत विवाहबंधनात अडकली, पहा शाही विवाहाचे काही क्षण (Photos)
Soundarya Rajinikanth and Vishagan Vanangamudi wedding (Photo Credits: Instagram)

Soundarya Rajinikanth-Vishagan Vanangamudi Wedding: दाक्षिणात्य सिनेमामधील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी सौंदर्या (Soundarya)आज अभिनेता आणि उद्योगपती विशागन वनानगामुडी (Vishagan Vanangamudi) सोबत विवाहबंधनात अडकली. चैन्नई येथील 'द लीला पॅलेस' (The Leela Palace) या हॉटेलमध्ये दिमाखदार स्वरूपात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. दाक्षिणात्य परंपरेनुसार विधीवध हा सोहळा झाला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर नवदांपत्यांनी मीडियासमोर येऊन खास फोटो झलक दिली.  नक्की वाचा: रजनीकांत यांची मुलगी 'सौंदर्या'चं दुसरं लग्न; पहा प्री वेडिंग सेलिब्रेशनचे खास फोटोज

नक्की वाचा:   सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप; पाहा काय करतात 'सौंदर्या'पती जावई

सौंदर्या दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. तिचं पहिलं लग्न अश्वनि राजकुमारसोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर सहा वर्षांनी दोघेही वेगळे झाले. त्यांना 4 वर्षांचा मुलगा सौंदर्यासोबतच राहतो.