रजनीकांत यांची मुलगी 'सौंदर्या'चं दुसरं लग्न; पहा प्री वेडिंग सेलिब्रेशनचे खास फोटोज
Soundarya Rajinikanth Vishagan Pre Wedding Reception (Photo Credit: Instagram)

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची मुलगी सौंदर्या (Soundarya) रजनीकांत हीच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सौंदर्या उद्योगपती विशागन वनानगामुडी (Vishagan Vanangamudi) सोबत विवाहबद्ध होणार असून हे सौंदर्याचं दुसरं लग्न आहे. लग्नापूर्वी प्री ग्रँड रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले होते. या रिसेप्शनमधील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोजक्या नातेवाईक, पाहुण्यांच्या उपस्थितीत प्री वेडिंग रिसेप्शन सोहळा रंगला. (सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वरबाप; पाहा काय करतात 'सौंदर्या'पती जावई)

यावेळेस सौंदर्या निळ्या साडीत तर विशगन पाश्चिमात्य पारंपरिक पोशाखात अगदी सुरेख दिसत होते.

11 फेब्रुवारीला सौंदर्या दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असून तिचं पहिलं लग्न अश्वनि राजकुमारसोबत झालं होतं. मात्र लग्नानंतर सहा वर्षांनी दोघेही विभक्त झाले. त्यांना 4 वर्षांचा मुलगाही आहे.