Milind Soman And Ankita Konwar Lip Kiss | (Photo Credits: Instagram)

व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) संपून आज व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा होत आहे. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटी मंडळीही व्हॅलेंटाईन मोठ्या आनंदात साजरा करत असून, या आनंदी क्षणांची काही खास छायाचित्रे ही मंडळी सोशल मीडियावरही शेअर करत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही आपल्या आवडते सेलिब्रेटी व्हॅलेंटाईन (Celebrity Valentine) कसा साजरा करत आहेत याची झलक पाहायला मिळते आहे. प्रसीद्ध मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman ) यांची पत्नी अंकिता कुंवर (Ankita Konwar) हिने या दोघांच्या अशाच काही खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. खरे तर हे फोटो Kiss Dayचे आहेत. परंतू, व्हॅलेंटाईन मौसम असल्याने हे फोटो सोशल मीडियावर अधिक चर्चिले जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे मिलिंद आणि अंकिता यांच्यात वयाचे बरेच अंतर आहे.

मिलिंद सोमण आणि अंकित कुंवर यांनी गेल्याच वर्षी विवाह केला आहे. या दोघांच्या प्रसिद्धीप्रमाणे हा विवाहही खूप गाजला. या दोघांच्या वयाचे अंतर पाहून सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आले. परंतू, सोशल मीडियावरील ट्रोलचा महापूर आणि व्यक्तिगत जीवन यांचा काही संबंध येत नाही. या दोघांमध्येही तरल नाते असून, त्यांचा संसारही सुखाने सुरु आहे. अंकिताने इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांमधील केमेस्ट्री पाहायला मिळते. या फोटोखाली अंकीताने लिहिले आहे की, "हर किस के साथ तुम मेरे दिल को सुलगने के लिए मजबूर कर देते हो. यह हर अंधेरे कोने को रोशन कर देती है. मैं तुम में थोड़ा और गहरा डूब जाती हूं. ये जादू हम पर थोड़ा और हावी हो जाता है." (हेही वाचा, Happy Kiss Day 2019: 'किस डे'च्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS)

काही दिवसांपूर्वी मिलिंदने त्याच्यात आणि पत्नीच्या वयात असलेल्या अंतराबाबत म्हटले होते की, मी वयांमधील अंतराला काहीही महत्व देत नाही. दोन व्यक्ती नेहमीच वेगळ्या असतात. मग त्या कोणत्याही वयातील, पार्श्वभूमीच्या, संस्कृतीच्या असल्या तरी, मला तिच्या वयाबाबत कधीच अडचण नव्हती, नाही, असणार नाही. आपल्या माहितीसाठी असे की, मिलिंद सोमन सध्या 53 वर्षे वयाचे आहेत. ते आपल्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असतात. ते मॅरथॉन स्पर्धेत सहभागी होतात, स्विमिंगही करतात. नुकताच भारताने त्यांना आयर्नमॅन पुरस्कार देऊनही सन्मानित केले आहे.