Valentine’s Day 2019: व्हेलेंटाईन वीकमध्ये 13 फेब्रुवारी हा दिवस 'किस डे' (Kiss Day) म्हणून साजरा केला जातो. यादिवशी तुमच्या मनातल्या भावना किसच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात. 'किस' हा दोन व्यक्तींमध्ये अत्यंत जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. मिठी(Hug) प्रमाणेच 'किस' (Kiss) देखील विविध स्वरूपाचे असते. त्याचा खास अर्थ असतो. व्यक्तीपरत्वे तो बदलतो. सहाजिकच तुम्ही लॉंग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये असाल तर या दिवसाचं सेलिब्रेशन करणं तुमच्या फिजिकली शक्य नसेल तर प्रेमाची भावना तुम्ही शब्दांतून, रोमॅन्टिक ग्रिटिंगच्या माध्यामातून किंवा GIF इमेजच्या माध्यमातून पोहचवू शकता. मग पहा तुमच्या साठीदारापर्यंत किस डे च्या शुभेच्छा पोहचवण्यासाठी या काही ग्रिटिंग्सचा फायदा होतोय का बघा. Happy Kiss Day 2019: 'XOXO' यामध्ये 'घट्ट मिठी' आणि 'किस' यांचं कनेक्शन नेमकं कुठून आलं?
मिठीत तुझ्या गुंतल्यावर
वाटते ओठांची चव चाखावी
मिठी तुझी सैल करून
ओठांकडे स्वारी वळवावी
Happy Kiss Day
रोजचं तुला 'Pyaar'करतो
रोजचं तुला 'Yaad'करतो
रोजचं तुला 'Miss'करतो
पण आजच्या दिवशी मी तुला 'Kiss' करतो
Happy Kiss Day
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला
मी ही सांगितले
केवळ तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे मला
Happy Kiss Day
एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची
लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची
एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची
पहाव अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची
Happy Kiss Day
Kiss Day 2019 GIF Images
संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असते. मग यंदा तुमचा व्हेलेंटाईन डे चा प्लॅन ठरला का?