Urfi Javed

Urfi Javed Bollywood Debut: सोशल मीडीयावर उर्फी जावेदचं (Urfi Javed) चाहता वर्ग भरपूर आहे. नेहमीच वेगवेगळ्या फॅशन स्टाईलमुळे चाहत्यांचं मनोरंजन करत असतं. तीच्या हॉट लुकमुळे ती सोशल मीडियावर व्हायरल होत असते. तीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उर्फी जावेद आता लवकरच हिंदी चित्रपटसुष्टीत (Bollywood) पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर उर्फी नेहमीच सक्रिय असते. आपली स्टाईल चर्चेत राहण्यासाठी उर्फी वेगवेगळे प्रयोग करत असते.

एकता कपुरच्या आगामी चित्रपटात उर्फी झळकणार आहे. ईटाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी 'लव्ह सेक्स और धोका 2' (Love Sex Aur Dhokha 2) या सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाली आहे. विशेषता या चित्रपटात पहिल्यांदा उर्फी मुख्य भुमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. पहिलांदाच अभिनयातून प्रेक्षकांचे मनोंरजन करणार आहे. उर्फी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्या मुळे  तिच्या चाहत्यांचा  भरपुर आनंद झाल्याचे दिसत आहे. पण अद्याप 'लव्ह सेक्स और धोखा 2'च्या निर्मात्यांनी किंवा उर्फीने अधिकृतरित्या याबद्दल भाष्य केलंलं नाही. लवकरच ती चाहत्यांना यासंदर्भात माहिती देईल, असे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर  उर्फीने काही दिवसांपूर्वी 'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमाचं एक पोस्टर इंस्टास्टोरीवर शेअर केलं होतं. हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं होतं,"जेव्हा तुम्हाला लाइक्स आणि रिपोस्ट करता येतील तेव्हा तुम्हाला गुलाब आणि चॉकटेलट मिळेल". 'लव्ह सेक्स और धोखा 2' या सिनेमात उर्फी जावेदसह 'बिग बॉस 16' फेम निमृत कौर अहलूवालियादेखील दिसणार आहे. 2010 मध्ये आलेल्या 'LSD' या सिनेमाचा हा सीक्वेल असणार आहे.