IIFA Awards 2022: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) पुरस्कार 2022 सोहळा संपन्न झाला. 2 जूनपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस शनिवार, 4 जून रोजी होता. येस आयलंड, अबु धाबी येथे आयोजित करण्यात आलेल्या IIFA च्या 22 व्या आवृत्तीत मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. पुरस्कार श्रेणीबद्दल बोलायचे तर सर्वांच्या नजरा सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराकडे लागल्या होत्या.
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा IIFA 2022 पुरस्कार अभिनेत्री कृति सेननला तिच्या 'मिमी' चित्रपटासाठी देण्यात आला. कृतिला हा पुरस्कार देण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला स्टेजवर बोलावण्यात आलं होते. 2021 मध्ये OTT वर प्रदर्शित झालेला मिमी हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटातील क्रितीच्या कामाचेही खूप कौतुक झाले होते. (हेही वाचा - Shakira and Gerard Pique Breakup: 12 वर्षांच्या एकत्र सहवासानंतर शकीरा-जेरार्ड पिकचा ब्रेकअप; लग्नाशिवाय आहेत 2 मुलं)
View this post on Instagram
View this post on Instagram
अभिनेता विकी कौशलला त्याच्या सरदार उधम या चित्रपटासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विकीने आपला पुरस्कार दिवंगत अभिनेता इरफान खानला समर्पित केला. वास्तविक, विक्कीच्या आधी इरफान खान ही भूमिका करणार होता.
View this post on Instagram
अभिनेत्री सई ताम्हणकर हिने मिमी चित्रपटासाठी परफॉर्मन्स इन अ सपोर्टिंग रोल (महिला) हा किताब पटकावला. जेनेलिया देशमुख, अर्जुन रामपाल आणि हर्ष जैन हे हा पुरस्कार देण्यासाठी मंचावर एकत्र आले. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पंकज त्रिपाठीला मिळाला. लुडोमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पंकज त्रिपाठी यांना पुरस्कार देण्यासाठी क्रिती सॅनन आणि नरेंद्र केसर यांना मंचावर बोलावण्यात आले.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, दोन वर्षांनंतर होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अनेक स्टार्संनी उपस्थिती लावली होती. अल्पावधीतच आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री अनन्या पांडे हिनेही आयफाच्या मंचावर आपल्या पहिल्याच परफॉर्मन्सने पदार्पण केले आहे.