Mumbai Saga Box Office Collection Day 1: जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाने पहिल्याचं दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
Mumbai Saga(Photo Credits: Youtube)

Mumbai Saga Box Office Collection Day 1: जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चा चित्रपट 'मुंबई सागा' (Mumbai Saga) रिलीज झाल्यानंतर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'मुंबई सागा' रिलीज झाल्यानंतर पहिल्याचं दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे अडीच कोटींचा व्यवसाय केला आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने चित्रपटाच्या कमाईची माहिती दिली आहे.

कोविडमुळे बर्‍याच ठिकाणी रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. याचा परिणाम जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीच्या 'मुंबई सागा' चित्रपटाच्या कमाईवरही झालेला दिसला. सध्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'मुंबई सागा' हा चित्रपट 2100 चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. (वाचा - Mumbai Saga Full Movie HD Free Download साठी TamilRockers आणि Torrent वर Leak; John Abraham स्टारर चित्रपटाचे निर्माता झाले अस्वस्थ)

दरम्यान, जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. जॉन आणि इमरान व्यतिरिक्त काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, रोनित रॉय, गुलशन ग्रोव्हर आणि अमोल गुप्ते या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहेत. या अ‍ॅक्शन चित्रपटाचे बजेट सुमारे 60 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. आगामी काळात हा चित्रपट जोरदार व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे.