Call Me Bae on Prime: बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची बहुप्रतिक्षित वेब सीरीज (Call Me Bae') ६ सप्टेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली. या सीरीजमध्ये अनन्याचा वेगळा लूक पाहायाला मिळत आहे. या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता लागली होती. सोशल मीडियावर या सीरिजला भरपूर प्रतिसाद देत आहे. (हेही वाचा- पंकज कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे टेनिस खेळण्यासारखे: नसीरुद्दीन शाह)
Call me bea या सीरिजमध्ये अनन्या पांडे एका श्रीमंत मुलीची भूमिका साकारत आहे. जिच्या आय़ुष्यात काही बदल होतात. या मालिकेत अनन्या पांडेशिवाय गुरफतेह पिरजादा, विहान सामत, वरुण सूद हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सर्व कलाकारांनी आपापली भूमिका चोख बजावली आहे.
View this post on Instagram
ही सीरीज पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता ही सीरीज अॅमेझोन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. सीरिजमध्ये गुरफतेह पिरजादा आणि विहान सामत यांची जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.