ख्यातनाम अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी सहकारी दिग्गज स्टार पंकज कपूर (Pankaj Kapur) यांच्यासोबत काम करण्याची तुलना स्पर्धात्मक टेनिस सामना खेळण्याशी केली आहे. जी प्रशंसा आणि आदराने भरलेली आहे. समीक्षक-प्रशंसित कलाकार अनुभव सिन्हा यांच्या आगामी Netflix मालिका IC 814: The Kandahar Hijack मध्ये दोघांनीही सोबत काम केले आहे. ही वेब सिरीज इंडियन एअरलाइन्स फ्लाइट IC 814 च्या 1999 च्या अपहरणावर आधारीत आहे. मालिकेतील पात्रे, कथानक आणि पात्रांच्या नावांवरुन काही मंडळींनी आक्षेप घेतला आहे. परिणामी ही वेब मालिका काहीशी वादात आहे. दरम्यान, निर्माण झालेला वाद आणि टीका यावरुन नेटफ्लीक्सकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
'अभिनेत्यासोबत काम करणे म्हणजे टेनिस खेळण्यासारखे'
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, पंकज कपूर यांच्यासोबत काम करणे म्हणजे स्वत:चीही उंची वाढविणे आहे. आपल्या अभिनयाने ते सोबतच्या कलाकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवताता. त्यांच्यासोबत काम करणे ही एक आनंददायी गोष्ट आहे. ते जेव्हा भूमिकेसाठी कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांनी त्या पात्रासंबंधी पूर्ण तयारी केलेली असते. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे टेनिस खेळण्यासारखे आहे. जो खेळताना तुम्हाला त्यांच्या खेळाचा हेवा वाटतो आणि त्याच वेळी त्याच्याबद्दलचा आदरही वाढतो, असे 74 वर्षीय शाह म्हणाले. (हेही वाचा, 'IC 814' Web Series Controversy: आयसी 814 वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात; हिंदू कोड नावांसह दहशतवाद्यांच्या चित्रणावरुन तीव्र प्रतिक्रिया)
पंकज कपूर आणि नसिरुद्दीन शाह: अभियाची जुगलबंदी
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नसिरुद्दीन शाह आणि पंकज कपूर हे प्रदीर्घ काळापासून परस्परांचे स्नेही आहेत. त्यांनी अनेक वर्षे विविध चित्रपटांमधून काम केले आहे. जवळपास तीन दशकांहून अधिक काळ ते परस्परांसोबत काम करत आले आहेत. 'जाने भी दो यारो', 'मंडी', 'खामोश' आणि 'मकबूल' यासह अनेक प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र केलेले काम विशेष गाजले. प्रेक्षक आणि समिक्षकांचीही त्यांना चांगली साथ मिळाली. 'IC 814: The Kandahar Hijack' मध्ये ते पुन्हा एकत्र काम करत आहेत. दोघेही तगडे अभिनेते असल्यामुळे त्यांची अभिनयाची जुगलबंदी पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. विमान अपहरणावर आधारीत वेब मालिकेद्वारे एकत्र येत असलेल्या या कलाकारांना आणि एकूणच सिरीजलाही प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे आगामी काळात कळेलच. (हेही वाचा, Netflix 'IC 814' Row: 'देशाच्या भावनेला ठेच न पोहचवता गोष्टी सादर करणार' नेटफ्लिक्स ची ग्वाही)
नेटफ्लिक्सवर दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याकडून (लेख 15) आणि Flight into Fear: A Captain’s Story, IC 814: The Kandahar Hijack या पुस्तकावर आधारीत या वेबसिरीजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह आणि पंकज कपूर प्रमुख भुमिकेत आहेत. लक्ष वेधून घेणारे इतरही कालाकार या सिरीजमध्ये पाहायला मिळतात.