सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी 10 वर्षांपूर्वी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने #MeToo चळवळीला वाचा फोडली होती. 2018 मध्ये हे प्रकरण फार गाजले होते. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' (Horn Ok Please) चित्रपटाच्या सेटवर आपल्याशी छेडछाड केली होती असे सांगत तिने खळबळ माजवली होती. त्यानंतर ती बरेच दिवस कॅमे-यासमोर आली नाही. मात्र आता तिने सोशल मिडियावर आपला फोटो शेअर केला असून त्यात तिचे झालेले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन (Body Transformation) पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या फोटोखाली तनुश्रीने लिहिले आहे की, तिने 15 किलो वजन घटवले आहे. तिने सुरु केलेल्या मी टू अभियानानंतर ती सोशल मिडियावर बरीच सक्रिय होती. त्यात ती आपल्या चाहत्यांशी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी ती सोशल मिडियावर शेअर करत होती. नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ संस्थेचा तनुश्री दत्ता विरोधात 25 कोटींचा मानहानीचा दावा
त्यानंतर तिचा आलेला हा फोटो चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. तिच्या या फोटोवर तिचे असंख्य चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या फोटोमध्ये तनुश्रीने गुलाबी टॉप आणि काळी पँट घातली आहे. या फोटोखाली '15 किलो वजन घटविल्यानंतरची मी' असे तिने लिहिले आहे.
तनुश्री 2018 मध्ये अमेरिकेवरुन परत आली होती. त्यावेळी तिचे वजन खूपच वाढलेले दिसत आहे. इम्रान हाश्मी सोबतचा 'आशिक बनाया आपने' हा चित्रपट तिचा प्रचंड गाजला होता. यातील किसिंग सीन्स आणि बोल्ड सीन्स सुद्धा प्रचंड चर्चेत आले होते.