![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/12/taimur-ali-khan-784x441-380x214.jpg)
Taimur Ali Khan Birthday Special : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करिना कपूर खान(Kareena Kapoor Khan) यांचा चिमुकला 'तैमुर अली खान' (Taimur Ali Khan) आज दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) त्याचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. तैमुरच्या जन्मापासूनच तो सतत इंटरनेटवर चर्चेमध्ये राहिला आहे. तैमुरचा निरागस चेहरा आणि स्वॅगची चर्चा तर रोजच इंटरनेट होत असते. स्टार किड सेलिब्रेटी बनलेल्या तैमुरचा प्रत्येक नवा फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही तरच नवल! तैमूर अली खानच्या एका फोटोची किंमत तब्बल 'इतके' रुपये, सैफ अली खानचा खुलासा
तैमुरचा पहिला वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये धूमधडाक्यात पार पडला होता तर यंदा सैफिना दक्षिण आफ्रिकेमध्ये तैमुरचा बर्थ डे सेलिब्रेट करणार आहेत.
पॅपराझी आणि इंटरनेटला वेड लावणारा तैमुरचा स्वॅग अंदाज
काही दिवसांपूर्वी तैमुरचा बॅटमॅन अंदाजातील एक फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला होता.
फोटोग्राफर्सना पाहून चिडवणार्या तैमुरच्या या अंदाजाचीदेखील खूप चर्चा आहे.
मुंबईत तैमुरने काही दिवसांपूर्वी घोड्यावर बसून रपेट मारण्याचाही आनंद लूटला आहे.
दिवाळी आणि रक्षाबंधनाच्या सणामध्ये सारा अली खानसोबत ट्रेडिशनल अंदाजामध्ये तैमुरने या सणांचा आनंद लुटला.
ऐरवी हसणारा, खिदळणारा तैमुर काही दिवसांपूर्वी शाळेच्या स्पोर्ट्स डे मध्ये मात्र मैदानावर रडतानाही दिसला.
मुंबईत तैमुरने काही दिवसांपूर्वी गाईला चारा दिला होता, सैफ सोबत घराबाहेर आलेल्या एका नंदीबैलाचं दर्शन घेतल्याचा फोटोदेखील चांगलाच व्हायरल झाला होता.
काही दिवसांपूर्वी करिना कपूरसोबत तैमुर गाडीतून खाली उतरला पण मीडिया फोटोग्राफर्सना पाहून तो चक्क करिनाचा हात सोडून मीडिया फोटोग्राफर्सकडे उत्साहाने धावताना दिसला.
तैमुरची सोशल मीडियामधील वाढती क्रेझ पाहून सैफ आणि करिनासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी तैमुरच्या स्वरूपातील डॉल देखील बाजारात आली आहे.