EXCLUSIVE Photo : बाजारात आला तैमुर अली खान  बाहुला !
तैमुर अली खान बाहुला Photo Exclusive

तैमुर अली खान हा केवळ स्टार किड नाही तर तो आज स्वतः एक सेलिब्रिटी झाला आहे. तैमुरचा नवा फोटो, व्हिडिओ पाहण्यासाठी अनेक मंडळी उत्सुक असतात. आजकाल तैमुर मीडियाला पाहून 'हाय', 'बाय' त्याच्या खास अंदाजात बोलायला शिकला आहे. निरागस भाव आणि गोंडस अंदाजातील तैमुरची एक छबी टिपण्यासाठी मीडियादेखील उत्सुक असते.

तैमुरची अंदाजातील डॉल

तैमुर हा सोशल मीडियात तुफान लोकप्रिय आहे. त्याच्या लोकप्रियतेची भूरळ मार्केटिंग क्षेत्रालाही पडली आहे. सध्या बाजारात चक्क त्याच्याप्रमाणे बाहुलादेखील मिळाला लागला आहे. निळ्या चेक्सचा शर्ट, काळी पॅट, गोबरे गाल आणि निळे डोळे याची हुबेहुब नक्कल असली तरी त्याच्या चेहर्‍यावरील निरागसतेची सर बाहुल्याला नाही.

 

taimur doll
तैमुर बाहुला Photo Credit : Exclusive

सतत मीडीयामध्ये झळकणारा तैमुर पाहता कपूर आणि पतौडी घरातील वरिष्ठ मंडळांनी त्यांचं बालपण हिरावत असल्याचं म्हटलं होतं. करिना आनी सैफ कटाक्षाने तैमुरला मीडीयापासून थोडं लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हतलं जात आहे.