तानाजी सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात; अजय देवगण तानाजी मालुसरे यांच्या मुख्य भूमिकेत
Tanhaji (Photo Credits: twitter)

छत्रपती शिवाजी महाराजांचे खरं बळ म्हणजे त्यांचे मावळे. तानाजी मालुसरे हे त्यांच्यापैकीच एकच होते. कोंढणा गड मिळवण्यासाठी तानाजींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा इतिहास आता लवकरच रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. या सिनेमात तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण दिसणार आहे. तर ओम राऊत (Om Raut) हा मराठमोळा दिग्दर्शक या सिनेमाची धुरा सांभाळणार आहे. आजपासून या सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात करण्यात आली आहे.Tanaji First Look : नववर्षाच्या सुरुवातीला 'तानाजी' सिनेमातील Ajay Devgan ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

अजय -अतुल ही जोडी संगीतकार जोडी 'तानाजी' सिनेमाचीदेखील जबाबदारी सांभाळणार आहे. सहा महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

ओम राऊतनं यापूर्वी 'लोकमान्य-एक युग पुरुष' या बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.