Tanaji First Look : नववर्षाच्या सुरुवातीला 'तानाजी' सिनेमातील Ajay Devgan ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!
'तानाजी' सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक (Photo Credit: Twitter)

First Look of Ajay Devgan In Tanaji Film  : महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांच्यासोबतच त्यांच्या मावळ्यांचे शौर्य आणि धैर्यही सर्वश्रूत आहे. त्यापैकीच एक मावळा म्हणजे तानाजी मालूसरे. 'गड आला पण सिंह गेला,' अशी ख्याती असलेला हा शूरवीर मावळा. यांचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक ओम राऊतनं (Om Raut) उचललं आहे. 'तानाजी' या सिनेमात तानाजी मालूसरेंच्या भूमिकेत अजय देवगन (Ajay Devgan) दिसणार आहे. Tanaji First Poster : अजय देवगण रुपेरी पडद्यावर साकारणार योद्धा तानाजी मालुसरे

अजयच्या ड्रिम प्रोजेक्टमधील त्याचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आला आहे. सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतने हा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देत नववर्षाची खास भेट ओम राऊतने आपल्या चाहत्यांना दिली आहे. अजयचा हा भारदस्त लूक सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवतो.

ओम राऊतनं यापूर्वी 'लोकमान्य-एक युग पुरुष' या बायोपिकचे दिग्दर्शन केले होते. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमात सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मराठमोळा अभिनेता अजिंक्य देवही या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.