First Look : अजय देवगण रुपेरी पडद्यावर साकारणार योद्धा तानाजी मालुसरे
तानाजी मालुसरेंच्या लूकमध्ये अजय (Photo Credit : Twitter)

शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांचे स्वराज्यप्रेम, धाडस आणि शौर्य सारं काही वाखाण्यासारखंच. अशाच एका धाडसी मावळा तानाजी मालूसरेंचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण या   सिनेमात प्रमुख भूमिकेत असून त्याने 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' ची पहिली झलक चाहत्यांच्या भेटीला आणली आहे. यात अजय हातात तलवार आणि ढाल घेऊन एका योद्ध्याप्रमाणे उभा असलेला दिसतो. अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट 'तानाजी'चं शुटिंग सुरू, नोव्हेंबर 2019 ला होणार रीलिज

आपल्या ड्रिम प्रोजेक्टमधील हा लूक शेअर करण्यापूर्वी अजयने लिहिले की, ''आम्ही कोणत्यातरी रोमांचक गोष्टीवर काम करत आहोत. तुमच्या सर्वांसोबत हे शेअर करण्यासाठी मी अधिक वाट नाही पाहु शकतं. मध्यरात्री शेअर करेन.''

अजयने पोस्टर शेअर करताना लिहिले की, ''हे लोक आपली माती आणि आपला राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लढले. भारताच्या गौरवशाली इतिहासातील योद्धा सुभेदार तानाजी मालूसरे.''

लवकरच अजय देवगण 'बादशाहो' आणि रोहीत शेट्टीने 'गोलमाल अगेन' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.