शिवरायांच्या इतिहासात 'गड आला पण सिंह गेला' अशी ओळख असलेला मराठमोळा मावळा तानाजी मालुसरेंचा जीवनपट लवकरच रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. अजय देवगण या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
ओम राऊतचं दिग्दर्शन
'लोकमान्य - एक युगपुरूष , या लोकमान्य टिळकांवरील बायोपिकचा अनुभव असलेला दिग्दर्शक ओम राऊत तानाजी या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहे. आजपासून या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. यावेळचे काही फोटो अजय देवगणने सोशल मीडियामध्ये शेअर केले आहेत.
.@ajaydevgn starts shooting for #Taanaji. pic.twitter.com/1A8k1u0NsB
— Filmfare (@filmfare) September 25, 2018
तानाजी हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे 22 नोव्हेंबर 2019 रोजी रीलिज होणार आहे. मुघलांविरूद्धाच्या युद्धात कोंढाणा किल्ला शिवरायांना मिळवून देण्यासाठी तानाजी मलुसरेंनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. तानाजींचा हा प्रताप रूपेरी पडद्यावर पहिल्यांदाच साकारला जाणार आहे.