बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आज, रविवार 14 जून रोजी आपल्या वांद्रयाच्या (Bandra) राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या घटनेननंतर बॉलिवूड पासून ते क्रीडा विश्वपर्यांततसेच राजकीय मंडळींनी सुद्धा खेद व्यक्त करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच आता एम एस धोनी (MS Dhoni) या चित्रपटात सुशांतसोबत काम केलेल्या अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने इंस्टाग्राम वर एक खास पोस्ट करून सुशांत सोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दिशाने आपल्या इंस्टाग्राम वरून एम एस धोनी चित्रपटातील एका सीन दरम्यान काढलेला फोटो पोस्ट केला आहे. आपण जाणतोच की एम एस धोनी या चित्रपटानंतर सुशांत च्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती, तोवर पवित्र रिश्ता या मालिकेमुळे ऐकिवात असलेले नाव या चित्रपटानंतर एक ओळख ठरले होते. (अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येचा बॉलिवूडला धक्का; अक्षय कुमार, रितेश देशमुख, बिपाशा बासू सहित 'या' कलाकारांनी ट्विट करून व्यक्त केल्या भावना)
सध्या तरी सुशांतच्या आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. मानसिक नैराश्यातून सुशांत याने हे पाऊल उचलल्याचे शक्यता आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला आहे. काही वेळेपूर्वीच त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरून त्याचा मृतदेह पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात आला आहे. Sushant Singh Rajput Commit Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ही' होती शेवटची पोस्ट
दिशा पटानी इंस्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
दिशा पटानी ट्विट
💔
— Disha Patani (@DishPatani) June 14, 2020
दरम्यान, मागील काहीच महिन्यात बॉलीवूडला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. यापूर्वी अभिनेता इरफान खान, त्यांनतर दुसर्याच दिवशी अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. या दोघांनाही कँसर होता. मात्र सुशांतने स्वतः आपल्या मृत्यूचा निर्णय घेऊन आपल्या फॅन्सना मोठा धक्का दिला आहे.