Bollywood Celebrities Committed Suicide: बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी आत्महत्या करत संपवली आपली जीवनयात्रा!
Sushant Singh Rajput & Jiah Khan (Photo Credits: Facebook)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कलाविश्वाला जबर धक्का बसला आहे. बॉलिवूडकरांकडून हळहळ व्यक्त केली जात असून क्रीडाविश्व, राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त होत आहे. सुशांत सिंह याच्या निधनाच्या धक्कादायक बातमीनंतर चाहत्यांमध्येही दुःखी वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान 2020 मध्ये बॉलिवूडचे तीन तारे निखळले. इरफान खान (Irrfan Khan), ऋषि कपूर (Rishi Kapoor) आणि त्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत यांने जगातून अखेरचा निरोप घेतला. बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत नैराश्य, स्पर्धा, ताण-तणाव हे सामान्य आहेत. परंतु, ज्यांना यावर मात करणे जमले नाही. त्यांनी मात्र आत्महत्येचा पर्याय निवडला. (Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या निधनामुळे क्रीडाविश्वालाही जबर धक्का; विरेंद्र सेहवाग, सायना नेहवाल, शिखर धवन यांच्यासह क्रीडापटूंनी व्यक्त केल्या भावना)

यापूर्वी देखील अनेक बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. जिया खान, दिव्या भारती, गुरु दत्त, परवीन बॉबी यांनी आत्महत्या केली होती. त्यात आता सुशांत सिंह राजपूत या नावाची भर पडली आहे. अपार कष्टाने हिंदी मालिका ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास करणारा सुशांत सिंहचे करिअरही चांगले सुरु होते. परंतु, त्याच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे केले आहेत.

जिया खान:

नैराश्यात असलेल्या जिया खानने अवघ्या 25 वर्षात गळफास घेऊन आत्महत्या केली. गजनी, निःशब्द या सिनेमातून तिने काम केले होते.

 

View this post on Instagram

 

#JiaKhan at #Baggit

A post shared by Baggit (@baggitworld) on

दिव्या भारती:

इमारतीवरुन उडी मारुन दिव्या भारती हिने आपली जीवनयात्रा संपवली होती. दरम्यान प्रेमभंग झाल्याने तिने आत्महत्या केली असे काहीजण म्हणत होते. तर ती चुकून इमारतीवरुन पडली असे देखील बोलले जात होते. मात्र अद्याप तिच्या यामागचे गुढ उलघडले नाही.

गुरुदत्त:

मद्य सेवनानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन राहत्या घरी गुरुदत्त यांनी आत्महत्या केली होती.

परवीन बॉबी

परवीन बॉबी हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळला होता. दोन दिवसांनंतर तिचा मृत्यूची खबर लागली होती. मधुमेहाशी सामना करत असलेल्या परवीन बॉबीने राहत्या घरी आत्महत्या केली होती.

सुशांत सिंह राजपूत:

छोट्या पडद्यावरुन सुरु केलेला प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत यशस्वीरित्या आणणाऱ्या सुशांत सिंह राजपूत याने आज राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

सुशांत सिंह राजपूत याने याची अखेरची इंस्टाग्राम पोस्टही आपल्या आईबद्दलची होती. आई सोबतचा फोटो शेअर करत त्याने अगदी हळवा मेसेज लिहिला होता. यावरुन तो डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवते.