बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास लावल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सुशांतच्या जाण्याने सर्वांनाच दु:ख झाले असून प्रत्येक जण त्याच्यासोबतच्या आठवणी ताज्या करत आहेत. याच दरम्यान आता सुशांत सिंह याचा खास मित्र संदीप सिंह याने सोशल मीडियात एक मोठी भावनात्मक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सुशांतसोबत व्यथित केलेल्या क्षणांची आठवण करत जर आम्ही तुझ्यासोबत असतो तर तु असे केले नसतेस असे त्याने म्हटले आहे.(सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या Instagram अकाउंटवर झाला 'हा' मोठा बदल)
संदीप सिंह याने पोस्ट मध्ये सुशांत याने दिलेली वचने आणि त्याच्या गोष्टींबाबत सुद्धा लिहिले आहे. तर सुशांत सिंह याच्या निधनानंतर अंकिता लोखंडे ही संदीप सिंह याच्यासोबत सुशांतच्या परिवाराला भेटण्यासाठी गेली होती.