अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येनंतर नेपोटिजम, नैराश्य, बॉलिवूडमधील भेदभाव यांसारख्या अनेक गोष्टींना उधाण आले. याबाबत नेटक-यांमध्येही बरीच चर्चा रंगू लागली. आर्थिक परिस्थिती चांगली असून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सुशांतने हे पाऊल का उचलले हे अजूनही न उलगडलेलें कोडं आहे. तसेच तो खरंच नैराश्यामध्ये होता का याबाबतही तपास चालू आहे. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेतून 'मानव' या पात्रातून घराघरात पोहोचलेला सुशांत लोकांच्या कधी जवळचा झाला कळलच नाही. त्यानंतर 'काय पो चे, शुद्ध देसी रोमान्स, राबता, एम एस धोनी यांसारख्या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर स्वत:ची ओळख निर्माण केली.त्यामुळे त्याने आत्महत्या करणे हे कित्येकांना अजूनही पचणे जड जातय. सुशांतला मेसेजेस लिहिलेले टी शर्ट्स (T shirts) घालायची आवड होती. या टी शर्टमधून देखील तो नैराश्यात आल्याचे संकेत देत होते अशी चर्चा सध्या सुरु आहे.
मिडियाच्या गराड्यात असलेल्या सुशांतला अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कॅमेरामन गाठायचे. यावेळी अनेकदा तो वेगवेगळे संदेश लिहिलेले टी शर्ट घातलेला दिसला. या टी शर्टवर बरेच संदेश असायचा. कदाचित हे संदेश तो बॉलिवूडमधील करत असलेला संघर्ष दाखवत होते. Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या जीवनावर KRK बनवणार बायोपिक
सुशांतला घातलेल्या टी शर्ट्स पैकी काही टी शर्ट वर Survived, Fuck Fame, Comfortably Single, Error यासांरखे संदेश लिहिले होते. जे त्याचा बॉलिवूडमधील सुरु असलेल्या संघर्षाचे संकेत देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येविषयी मुंबई पोलिस तपास करत आहेत. आज सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला ब्रांदा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. सुशांतच्या कुटुंबियांनी आज पटना येथे अस्थिविसर्जन केलं. यावेळी सुशांतचे वडील केके सिंह, त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती आणि कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते.