Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या जीवनावर KRK बनवणार बायोपिक

Sushant Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर सुशांत संदर्भातील सर्वच बातम्या प्रचंड व्हायरल होत आहेत. सुशांतला अनेक प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटातून काढून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे तो डिप्प्रेशनमध्ये होता. यातूनचं त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं, अशी चर्चा चित्रपटसृष्टीत रंगली आहे. याचं गोष्टीवरून एकता कपूर (Ekta Kapoor), करण जौहर (Karan Johar), सलमान खान (Salman Khan) आणि इतर काही लोकांना सोशल मीडियावर ट्रोल (Troll) करण्यात येत आहे. अशातचं अभिनेता कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) ने सुशांतच्या जीवनावर आधारित बायोपीक बनवण्याची घोषणा केली आहे.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

केआरके (KRK) ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात घोषणा करताना म्हटलं आहे की, 'मी वचन देता की, लवकरचं सुशांत सिंह राजपूतच्या जीवनावर बायोपीकची निर्मिती करील आणि सर्व दोषींना उघडकीस आणील. मला बॉलिवूडमधील लोकांचा द्वेष करायला आवडते,' असंही KRK ने म्हटलं आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Ashes Immersion: सुशांत सिंह राजपूतला अखेरचा निरोप; गंगेत विसर्जित केल्या अस्थी (See Photo))

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येविषयी मुंबई पोलिस तपास करत आहेत. आज सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला ब्रांदा पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. सुशांतच्या कुटुंबियांनी आज पटना येथे अस्थिविसर्जन केलं. यावेळी सुशांतचे वडील केके सिंह, त्याची बहीण श्वेतासिंह कीर्ती आणि कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2020 04:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).