काय पो चे, एम एस धोनी, छिछोरे यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येने सर्व बॉलिवूड जगतावर शोककळा पसरली. तर त्याच्या चाहत्यांना अनपेक्षितपेणे मिळालेल्या बातमीने त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली. सुशांतचा चाहत्यांना हा धक्का पचवणे खूप अवघड होऊन बसलं आहे. यामुळेच की काय सुशांतच्या आठवणींना कायम आपल्या स्मरणात ठेवण्यासाठी इन्स्टाग्राम ने एक विशेष पाऊल उचलले आहे. सुशांतच्या इन्स्टाग्रामवरील (Instagram) अकाउंटवर हा विशेष बदल करण्यात आला आहे.
सुशांतच्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईलवर आता 'Remembering' हा शब्द जोडला आहे. सुशांतच्या इन्स्टाग्राम अकाउंटला त्याची आठवण म्हणून एक वस्तू च्या रुपात समजून इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलले आहे.
सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति (Shweta Singh Kirti) ने फेसबुकच्या माध्यमातून एक घोषणा केली होती की, आपल्या भावाच्या आठवणी स्वरूप वस्तू, फोटो, त्याने लिहिलेले लेख एका वेबसाइटवर प्रदर्शित केले जाईल. ही वेबसाइट सुशांतला समर्पित केली असेल जिथे त्याचे चाहते आणि कलाकारांद्वारे लिहिलेल्या रोमांचक गोष्टी वाचायला मिळतील.
बिहारमध्ये जन्मलेल्या सुशांतच्या मुंबई येथे पार पडलेल्या अंत्यसंस्कारानंतर, आता त्याच्या अस्थींचे गुरुवारी (18 जून) गंगेमध्ये विसर्जन (Ashes Immersion) करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सुशांतचे अत्यंत जवळचे लोक यावेळी उपस्थित होते. विलेपार्ले स्मशानभूमी घाटावरील अखेरच्या अंत्यसंस्कारानंतर सुशांतच्या अस्थी मुंबईतील पटना येथे आणण्यात आल्या होत्या.